अशाप्रकारच्या खेळीमेळीच्या कार्यशाळा बदलाची सुरुवात ठरू शकतात. आपण कायम पेपर मध्ये, पुस्तकात वाचतो ते कचरा वर्गीकरण प्रत्यक्ष अनुभवातून, खेळातून शिकलं कि जास्त चांगलं लक्षात राहतं.
स्वरुप आणि रोशन ने दाखवलेल्या खताचा वास का येत नाही.. कचरा असून झूरळ, किडेमुंग्यांचा त्रास कसा होत नाही असे ना ना प्रश्न जमलेल्या महिलांनी विचारले.. अनेकींनी कंपोस्टर विकत घ्यायची तयारी दाखवली. आणि शेवटी प्रत्येक जण जास्तीत जास्त खताच्या पिशव्या घेऊन जाण्यासाठी उत्सुक होतं..