Skip to content Skip to sidebar Skip to footer

अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे गरोदर महिलांची फरफट !

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आरोग्याअभावी गरोदर महिलेचा झालेला मृत्यू हि खरं  तर खूप दुर्दैवी घटना आहे पण अशाच घटनांची पुनरावृत्ती होणे हे कितपत योग्य म्हणता येईल.

महाराष्ट्र्रातील काही दुर्गम आदिवासी, खेडे भागात आरोग्यासारख्या मुख्य गरजांच्या अडचणी अजूनही आहेत. गेल्या महिन्याभरात धुळे, इगतपुरी, पालघर  आणि गडचिरोली या भागात आरोग्याच्या सुविधांअभावी पाच घटना घडल्या. यापैकी दोन रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.

गावापासून दवाखाने आणि आरोग्यकेंद्र कोसभर दूर आहेत आणि मुख्य म्हणजे दवाखान्यात जाण्यासाठी गावाला जोडणारे पक्के रस्तेच नाहीत. त्यामुळे गरोदर महिलांना किंवा गंभीररीत्या आजारी असलेल्या रुग्णांना अक्षरशः लाकडाला झोळी करून दोन-तीन किमीचा रस्ता पार करावा लागतो. 

या परिस्थितीला बदलण्यासाठी झटका डॉट ऑर्गने ऑनलाईन मोहीमेच्या माध्यमातून लोकांच्या सह्या घेतल्या व हा विषय जास्तीत लोकांपर्यंत पोहचवून प्रशासनाला  जागे  करण्याचा एक प्रयत्न सुरु केला. 

 पत्रकार अल्पेश करकरे यांनी आमच्या टीमशी  संपर्क साधून सदर अडचणीविषयी  अधिक माहिती समजून घेतली आणि या समस्त बांधवांना न्याय देण्यासाठी देण्यासाठी विधानसभा सदस्यांपर्यंत पोहचायला मदत केली. 

 इगतपुरी येथील जूनवनेवाडीतील मृत्यू पावलेल्या गरोदर महिलेच्या न्यायासाठी अखेर २६ जुलै 2023 रोजी झालेल्या विधानसभा अधिवेशनात मा.आमदार वर्षा गायकवाड, मा.आमदार नाना पटोले व मा.आमदार  बाळासाहेब थोरात यांनी या विषयाची दखल घेत या मुद्द्यावर अधिवेशनात प्रश्न मांडले. 

यानंतर ताबडतोब नाशिक जिल्हा परिषदेने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. आता जुनवणे गावात तीन किलो मीटरच्या रस्त्यासाठी संबंधित विभागाकडून ७० लाख रुपये निधीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे मांडण्यात आला  आहे

परंतु हे फक्त एका जिल्हा परिषद प्रशासनाने उचलेले पाऊल आहे. अजून इतर भागातही लवकरात लवकर कृती करण्यासाठी आम्ही इतर जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद आणि थेट आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहचून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेला पाठिंबा देण्याची गरज आहे. खाली दिलेल्या पेटीशनवर सही करून आम्हाला प्रशासन आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहचायला मदत करा. 

Leave a comment

 • coblos4d
 • coblos4d
 • coblos4d
 • https://146.190.97.109/
 • rtp coblos4d
 • coblos4d
 • coblos4d
 • coblos4d
 • https://desa-sidorejo.penajamkab.go.id/wp-content/plugins/wp-automatic/thai-x/
 • https://mti.unisbank.ac.id/wp-content/slot-singapore/
 • https://lsp-p1.mercubuana-yogya.ac.id/slot-gacor-hari-ini-server-luar/
 • https://ktuner.com/dragon77/
 • coblos4d
 • coblos4d
 • https://heylink.me/.coblos4d/
 • https://ft.unram.ac.id/thai/
 • https://pilmapres.umj.ac.id/www/
 • https://sisdakin.polkam.go.id/thagcr/
 • https://ppid.cianjurkab.go.id/site/
 • https://perpustakaan.polkam.go.id/coba/
 • slot88
 • slot77
 • https://www.fullpress.it/
 • hoki88
 • coblos4d
 • https://sbsinkubator.unisbank.ac.id/wp-content/thai/
 • coblos4d
 • https://davanuserviss.lv/blogs/
 • https://www.wyjatkowyprezent.pl/blog/
 • viocash
 • coblos4d
 • coblos4d