नमस्कार..
आपल्या माहित आहे का? तोंड न झाकता खोकणे आणि शिंकणे करोना व्हायरसच्या संक्रमणात एका शस्त्राचे (हत्याराचे) काम करू शकते.
जेव्हा आपल्या आजूबाजूला एखादी संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा तिच्या नाकातून आणि तोंडातून निघणारे शिंतोडे इतरांना आजारी करू शकतात.
म्हणूनच आपल्या संरक्षणासाठी आपण ह्या ५ पायऱ्यांचे अनुसरण करू शकता.
१. खोकताना आणि शिंकताना आपले नाक आणि तोंड रुमालाने, स्वच्छ कपड्याने किंवा टिश्यू पेपरने झाका. किंवा रूमाल वगैरे सोबत नसल्यास हाताचा कोपर वाकवून तोंड झाका.
२. असे केल्यानंतर आपले हात साबण आणि स्वच्छ पाण्याने चांगल्याप्रकारे २० सेकंदांपर्यंत धुवा.
३. इथं तिथं उघड्यावर थुंकू नका.
४. आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा.
५. कोणत्याही शिंकणाऱ्या किंवा खोकणाऱ्या व्यक्तीपासून कमीतकमी १ मीटर म्हणजेच ३ फुटांचे अंतर ठेवा. या काळात सर्वांपासून इतके अंतर तर अवश्य (नक्की) ठेवावे.
लक्षात ठेवा, ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होणे करोनाव्हायरसची सामान्य लक्षणं आहेत.
आपण सर्व मिळून करोनाव्हायरसवर मात करू शकतो. योग्य माहिती आणि त्याचा योग्य वापर आपल्या सर्वांना सुरक्षित करू शकतो. धन्यवाद.