Skip to content Skip to sidebar Skip to footer

 नमस्कार… 

सगळीकडे हल्ली करोनाव्हायरस (करोनाविषाणू) बद्दल चर्चा चालू आहे, करोनाविषाणूपासून आपण कसे वाचू शकतो?

 याचे संक्रमण रोखण्यासाठी अनेक उपाय आहेत.. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे हात धुणे!

 जेव्हा आजूबाजूला एखादी व्यक्ती खोकते किंवा शिंकतेतेव्हा तिच्या नाकातून किंवा तोंडातून निघणारे शिंतोडे आजूबाजूला असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आजारी करू शकतात.

तसेच आजूबाजूला ठेवलेले सामान किंवा पृष्ठभागाला देखील संक्रमित करतात. ह्या संक्रमित सामानाला किंवा पृष्ठभागाला हात लावल्यानंतर, आपण आपल्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केला की, 

या विषाणूला आपल्या शरीरात शिरण्याचा मार्ग मिळतो. म्हणूनच हातांना दर थोड्याथोड्या वेळाने चांगल्या प्रकारे साबण आणि पाण्याने धुतले पाहिजेत. 

 तर सर्वात आधी..

१. आपल्या हातांना ओले करा. त्यावर व्यवस्थित साबण लावा.

२. तळहाताला, मग हाताच्या मागील बाजूला, मग मूठीला, मग अंगठ्याच्या आजूबाजूला, मग नखांला आणि सर्वात शेवटी मनगटावर साबण लावा. लक्षात राहील ना?

३. २० सेकंदांपर्यंत चांगल्याप्रकारे आपल्या हातांच्या या सहा भागांवर साबण लावून धुवा आणि हातांना कोरडे करा.

४. हात केव्हा केव्हा धुणे गरजेचे आहे? तर, टॉयलेट चा वापर म्हणजे लघवी किंवा शौच केल्यानंतर, स्वयंपाक करण्याआधी, जेवण वाढण्याआधी आणि काहीही खाण्याआधी, त्याव्यतिरिक्त खोकल्यानंतर आणि शिंकल्यानंतर सुद्धा.

कोरोनाविषाणूच्या संक्रमणापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सतत हात धुवा आणि काळजी घ्या.

लक्षात ठेवा..आपण सर्व मिळून करोनाव्हायरसवर मात करु शकतो. योग्य माहिती आणि त्याचा योग्य वापर आपल्या सर्वांना सुरक्षित करू शकतो, धन्यवाद.

Leave a comment

  • ipkslot
  • slot gacor
  • ipkslot
  • ipkslot
  • ipkslot
  • rajawali888
  • rajawali888
  • kpr777
  • pulsa777
  • pulsa777