सफर संस्थेने यादरम्यान लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्यात सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराबाहेरील कामे, कष्टाची कामे टाळणे. जॉगिंग ऐवजी थोडेसेच चालावे अशा गोष्टींचा समावेश होतो.
मुंबईत श्वसनाचे आजार वाढत आहेत. मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता एक हेल्थ इमर्जन्सी झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने आता यावर तातडीने लक्ष देऊन पुढील पावले उचलण्याची गरज आहे.