Skip to content Skip to sidebar Skip to footer
मुंबईच्या हवेतील दोन तृतीयांश पार्टिकल्स हे रस्त्यावरची धूळ असतात.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नॅशनल एन्व्हायर्मेंट इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (नेरी) यांच्या २०२१ च्या अभ्यासानुसार मुंबईच्या हवेतील पर्टिक्युलेट मॅटर मध्ये ७१% प्रमाण रस्त्यावरच्या धूलिकणांचे आहे.                                 २०१० मध्ये हे प्रमाण २८% होते. गेल्या दशकभरात झपाट्याने वाढलेल्या उंच इमारती आणि महामार्ग ही वाढलेल्या धुळीची प्रमुख कारणे आहेत.[1]

धुळीचे प्रमाण कमी कारण्यासाठी शहरातील सर्व Construction and Demolition (बांधकाम आणि विनाश) कामांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यापैकी काही सूचना अशा आहेत.

  1. धूळ उठत राहू नये म्हणून पाणी शिंपडणे.
  2. जे सहज हवेने उडून जाऊ शकते अशा बांधकाम साहित्याच्या ढिगाऱ्यावर कव्हर शीटचा (प्लॅस्टिक, ताडपत्री इ.) वापर करणे.
  3. तात्पुरत्या काळासाठी मलबा टाकण्याच्या जागा झाकणे, बांधकामे, विशेषतः आजूबाजूचे रहिवासी क्षेत्र यांना पुरेसे कव्हर असणे. 

हवेची गुणवत्ता सतत खालावत असूनही या मार्गदर्शक सूचनांचे पालन मुंबईत होत नाही.

यामुळे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) घसरला आहे. डिसेंबरमध्ये AQI च्या आकड्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

सफर संस्थेने यादरम्यान लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्यात सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराबाहेरील कामे, कष्टाची कामे टाळणे. जॉगिंग ऐवजी थोडेसेच चालावे अशा गोष्टींचा समावेश होतो. 

मुंबईत श्वसनाचे आजार वाढत आहेत. मुंबईतील वाढते वायुप्रदूषण आता एक हेल्थ इमर्जन्सी झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने आता यावर तातडीने लक्ष देऊन पुढील पावले उचलण्याची गरज आहे.

  1. मुंबई मधील सार्वजनिक आणि खाजगी बांधकाम प्रकल्पांना धूळ नियंत्रित करण्यासाठीच्या नियमांचे काटेकोरपालन करणे बंधनकारक करावे
  2. सर्व नागरिकांसाठी आरोग्यसल्ला जाहीर करावा.

Leave a comment

  • ipkslot
  • slot gacor
  • ipkslot
  • ipkslot
  • ipkslot
  • rajawali888
  • rajawali888
  • kpr777
  • pulsa777
  • pulsa777