Skip to content Skip to sidebar Skip to footer

अवकाळी पाऊस म्हणजे तुमच्यासाठी काय? मिम्स बनवण्याची संधी? मित्र मैत्रिणींसोबत लॉन्गराईड?  की घरी बसून चहा भजीचा प्लॅन? अनेकांसाठी अवकाळी पाऊस म्हणजे मजा करण्याची संधी असते पण एका शेतकऱ्यासाठी  वर्षभराच्या कमाईची परीक्षा आहे.

26 नोव्हेंबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्हयातील मनमाड, चांदवड, निफाड आणि नांदगाव या भागात मोठी गारपीट झाली. निफाड तालुक्यातील जवळच्या गावात काही शेतकऱ्यांना भेटलो. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. जवळ जवळ छोट्या पेरूच्या आकाराएवढया  गारा असल्याचे शेतकरी सांगत होते. शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात काम करत असतांना दुपारच्या 3 वाजेच्या सुमारास जोराचा वारा आणि पावसाच्या सरी सुरू झाल्या आणि त्या पाठोपाठ गारांच्या पावसाला सुरुवात झाली. गार इतकी मोठी होती की, अंगावर त्याचा मार लागत होता. शेतकरी, जनावरे यांची एकदम पळापळ सुरू झाली.

दुपारी सुरू झालेला हा पाऊस मध्यरात्रीपर्यंत चालू होता. त्यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात कांदे, गहू, मका, उस आणि सोयाबीनचे पीक होते. कांद्याचे रोप असलेल्या शेतात पाणी साचले होते. काही शेतकऱ्यांचे कांदे काढणीवर आलेले होते जे आत्ता काहीच हाती लागणार नाहीत. ऊस जमिनीलगत सपाट झाला होता. सोयाबिनचे पीकसुद्धा  काढणीवर असल्याने पावसामुळे सडून खराब झाले. मका आणि गहू यांची नुकतीच पेरणी झालेली होती. गाराच्या पावसाने पिकाला मार बसल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे.

द्राक्ष शेतकऱ्यांना तर मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागेसाठी मोठा  खर्च करून  केलेली गुंतवणूक तोट्यात गेली आहे. कोठूरे येथील सागर पोटे यांची स्वत:ची द्राक्ष बाग आहे. बागेसाठी त्यांनी सोने गहान ठेवून भांडवल उभे केले होते. त्यावर केलेली मेहनत सगळी वाया गेली असल्याचे ते सांगतात. गेल्या दोन-तीन वर्षापासून या भागात अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. सागर पोटे यांना मागील वर्षापूर्वीच्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे एक एकरचा बाग तोडावा लागला होता.  आणि आता उरलेला बाग सुध्दा तोट्यात गेला आहे. अशीच स्थिती या भागातील हजारो शेतकऱ्यांची झाली आहे.

जलयुक्त शिवार, पाणीदार गाव, सामाजिक वनीकरण, पाणी अडवा पाणी जिरवा, बीज संकलन, नदी पुनरुज्जीवन, मृदा संधारण हे सगळं अजून मोठ्या ताकदीने करायची हीच ती वेळ आहे. शाळांमधून मुलांना वातावरणीय बदलाबद्दल अजून जास्त शिकवून त्यांना climate resiliency साठीचे उद्याचे climate warrior म्हणून तयार केलं पाहीजे.

शुभांगी आणि शितल
प्रोजेक्ट वाटा

Leave a comment

  • ipkslot
  • slot gacor
  • ipkslot
  • ipkslot
  • ipkslot
  • rajawali888
  • rajawali888
  • kpr777
  • pulsa777
  • pulsa777