Skip to content Skip to footer

चला व्यक्त होऊया

पुण्यात कडक lockdown लागलंय. गजबजलेल्या बाजारपेठा, रस्ते, शाळा, महाविद्यालये परत ओस पडली आहेत. महाराष्ट्रातील इतरही शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे.

पण lockdown चा एक फायदा नक्की आहे. ज्या गोष्टींबद्दल आपण सहसा बोलत नव्हतो, विचार करत नव्हतो, ज्याबद्दल मोकळेपणाने गप्पा होत नव्हत्या अशा अनेक गोष्टी आपण बोलायला, व्यक्त करायला लागलो. मग ते मानसिक स्वास्थ्य असो, घरकामात पुरुषांनी करावयाची मदत असो, प्रदूषण, मुलांच्या शाळेव्यतिरिक्त गोष्टी अशा अनेक छुप्या विषयांना lockdown  च्या निमित्ताने हात घातला गेला, त्याबद्दल बोललं गेलं.

असाच एक विषय आहे जो अनेक पुणेकरांसाठी अगदी रोजच डोळ्याखालून घालूनही दुर्लक्षित राहतो तो म्हणजे पुण्याची नदी. मी जेव्हा २००९ साली मुळा आणि मुठा नद्या पहिल्यांदा पाहिल्या तेव्हा त्यांना नद्या म्हणावं कि नाही हाच पहिला प्रश्न होता. ज्या नद्यांच्या काठी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं गेलं त्या नद्या अशा मृतावस्थेत पाहून खूप वाईट वाटलं. पण व्यक्त कुठं व्हावं आणि कसं ते कळतंच नव्हतं. आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात मीही त्याकडे दुर्लक्ष करीत राहिलो. पण lockdown च्या काळात वेळ मिळाला, भरपूर वाचलं, नदी जितकी डोळ्याला घाण दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त ती आरोग्याला घातक आहे हे कळलं. २०१६ पासून मंजूर झालेलं Sewage Treatment Plant चं काम आज पाच वर्षांनंतरही सुरु होत नाही म्हणून राग आला. आणि मग यावर काही नेत्यांना, संस्थांना, वृत्तपत्रांना लिहून काय करता येईल, नेमकं कुठं अडतंय यावर चर्चा केल्या. आणि मग कळलं कि सामान्य पुणेकर जोपर्यंत याबद्दल मोठ्या प्रमाणात व्यक्त होत नाही तोपर्यंत कुणालाही यात interest येणार नाही.

म्हणून पुणेकरांनो आणि पुण्यावर प्रेम करणाऱ्यांनो, आम्हाला तुमची मदत हवी आहे. मुळा मुठेच्या सद्यस्थितीवर तुम्ही व्यक्त व्हा. तुम्हाला तुमच्या नदीकडे पाहून काय वाटतं, राग येतो? वाईट वाटतं? हसू येतं, चिडचिड होते? तुमची काहीही भावना असेल, व्यक्त व्हा.

तुम्ही comment करू शकता, व्हिडीओ बनवून पाठवू शकता, किंवा तरुण मनाची माणसं खाली दिलेल्या meme generator च्या आधारे व्यक्त होऊ शकतात. तुम्ही meme बनवला कि आम्हाला tag करून तो social मीडियावर नक्की टाका. फेसबुक पोस्ट आणि स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट आणि स्टोरी, ट्विटर अशा तिन्ही प्लॅटफॉर्मवर आपले memes टाका. निवडक पोस्ट आम्ही रिपोस्ट आणि रिट्विट करू.*

वाट काय बघताय मग, चला व्यक्त होऊया !

*टीप : memes review केल्यावरच पब्लिक केले जातील.